A girl born on 13th Aug 1978 at Pune, India where her biological parents were unable to support her, was placed at the doorsteps of an Orphanage called Shreevatsa ( child care center run by SOFOSH). The orphanage home gave her a name, Laila.
A couple from Michigan, US, named Haren & Sue, Sthalekar, who had a daughter but wanted to adopt a boy came to this orphanage home in search of a baby boy but didn’t find any. Sue meanwhile fell in love with big brown eyes of Laila and decided to adopt her. After legal formalities were completed, the couple took the little girl back to US and changed her name from Laila to Lisa. Later, the couple settled down in Sydney, Australia.
The girl was introduced to Cricket by her father and started playing in her backyard along with her father and later on the nearby grounds with the boys. The love for cricket never ended as she grew up and completed her studies.
* 1997 debut for New South Wales
* 2001 debut in Odis for Australia
* 2003 debut in Tests for Australia
* 2005 debut in T20Is for Australia
* 8 Tests, 416 Runs & 23 Wkts
* 125 Odis, 2728 Runs & 146 Wkts
* 54 T20Is, 769 Runs & 60 Wkts
* 1st Woman Cricketer to complete the double of 1000 Runs & 100 Wickets in Odis
* When ICC introduced Rankings, she was rated as No 1 All rounder
* Captained Australia
* Part of 4 WC titles (Odis + T20Is)
* Lisa Sthalekar, yesterday Inducted in ICC Hall of Fame
महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर. तिचे नाव ऐकून अनेक भारतीयांना हे नाव जरास ओळखीचं किंवा भारतीय असल्याचे लक्षात येईल. तसा लिसा जन्माने भारतातीलच पण तिचा भारतीय ते ऑस्ट्रेलियन हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच झाला आहे. तिच्याच या प्रवासाची गोष्ट आज सांगणार आहोत.
लिसाचा जन्म ४१ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ ऑगस्ट १९७९ ला पुण्यात झाला. पण तिच्या आई-वडिलांनी तिला श्रीवत्स अनाथालयात म्हणजेच सोफोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेत तिच्या जन्मानंतर सोडून दिले. त्या अनाथालयात तिला सर्वजण लैला म्हणून ओळखायचे. तीची तब्येत त्यावेळी फारशी बरी नव्हती.
त्याचवेळी अमेरिकेत स्थायिक झालेले हरेन आणि स्यू स्थळेकर एक मुलगा दत्तक घ्यायचा म्हणून भारतात आले होते. हरेन भारतीय होते तर स्यू इंग्लिश होत्या. या स्थळेकर दांपत्याने ६ वर्षांपूर्वी कॅप्रिनी या मुलीला बंगळुरुमधून आधीच दत्तक घेतले होते. त्यामुळे आता ते एक मुलगा दत्तक घेण्यासाठी आले होते. पण मुंबईत त्यांना दत्तक घ्यावा असा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना पुण्यातील अनाथलायला भेट देण्याबद्दल सुचवले. यावेळी ३ आठवड्यांची असलेल्या लैलाला काळजी घेण्याऱ्या कोणाचीतरी गरज होती. त्यावेळी स्थळेकर दांपत्याने तिला थोडेदिवस सांभाळले. याचकाळात त्यांना तिचा लळा लागला आणि त्यांनी मुलाऐवजी तिलाच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
परंतू त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्यानंतर त्यांना काही दिवसातच अमेरिकेला परत जायचे होते. त्यामुळे लहानग्या लैलाचे कागदपत्र वैगरे काहीच तयार नव्हते. पण स्थळेकर दांपत्याने हार न मानता लगेचच तिचे कागदपत्र तयार केले. ती आता लैला राहिली नव्हती तर तिची ओळख होती लिसा स्थळेकर. लिसा तिच्या नव्या कुटुंबासमवेत अमेरिकेला गेली.
पुढे स्थळेकर कुटुंबिय अमेरिकेतून केनिया आणि नंतर केनियातून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झाले आणि लिसाचा ऑस्ट्रेलियन म्हणून प्रवास सुरु झाला. ऑस्ट्रेलियात क्रिडा संस्कृती आधीपासूनच रुजलेली आहेच. त्याचबरोबर तिला तिच्या वडिलांनी हरेन यांनी क्रिकेटशी ओळख करुन दिली. तिलाही त्यावेळी घरात बसून टीव्ही पाहण्यात किंवा वाचन वैगरे करण्यात रस नव्हता. लिसा तिच्या वडिलांबरोबर अंगणात क्रिकेट खेळायला लागली. ती ५ किंवा ६ वर्षांची असल्यापासून तिचे वडील तिच्याकडे चेंडू फेकायचे आणि ती बॅटिंग करायची. असे करत असतानाच तिला क्रिकेटची आवड लागली. तिचे वडिल तिला एकदा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरही घेऊन गेले. तिने वडिलांना सांगितले की तिला क्रिकेट खेळायचे आहे. पण त्यावेळी तिच्या वडिलांना खात्री नव्हती की मुली हा खेळ खेळतात की नाही यात काही पुढे भविष्य आहे की नाही. पण आपल्या मुलीची क्रिकेटची आवड पाहून त्यांनी तेथील स्थानिक क्बलशी चर्चा केली. यावेळी त्यांना काही अडचणीही आल्या.
यादरम्यान तिला क्रिकेट खेळताना ती मुलगी असल्याचेही लपवायला लागले. ती लांब पँट घालायची आणि अगदी गोलंदाजी करताना ती कॅप घालायची, तीची ही सवय नंतर शेवटपर्यंत राहिली. त्यादरम्यान एकदा ती फलंदाजी करताना हेल्मट घालण्याऐवजी कॅप घालून गेली आणि एकेरी धाव धावत असताना तीची कॅप निघाली आणि खाली पडली. त्यावेळी तीची मोठी वेणी पाहून तेथील मुले म्हणाली अरे ही तर मुलगी आहे. ती १६ वर्षांखालील क्रिकेट खेळेपर्यंत मुलांबरोबर क्रिकेट खेळली.
लिसा लहान असताना तिची बहिण कॅप्रिनीने लिसासाठी एक उशी तयार केली होती, ज्यावर लिहिले होते की ‘शूss, मला उठवू नका, मी माझ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत आहे.’
तीला ऍडम गिलख्रिस्ट, मायकल स्लॅटर यांना क्रिकेट खेळताना पहायला आवडायचे. ते कधी तिचे आदर्श नव्हते पण ती म्हणते तिला त्यांना क्रिकेट खेळताना पहायला आवडते.
ती शालेय स्थरावरही क्रिकेट खेळली. तिला नंतर १९ वर्षांखालील न्यू साऊथ वेल्स संघाकडून खेळण्याचीही संधी मिळाली. इथेच तिची भेच स्टिव्ह जेन्किन यांच्याशी झाली. त्यांनी तिला पुढे प्रत्येक स्थरावर प्रशिक्षण दिले. पण काही दिवसांनंतर तिची कामगिरी चांगली न झाल्याने तिला संघातून वगळण्यातही आले. परंतू तिने पुन्हा जिद्दीने प्रयत्न केले. अखेर तिला यश आले ते २००१ मध्ये. तिची ऍशेस मालिकेसाठी २००१ ला ऑस्ट्रेलिया महिला संघात निवड झाली. पण दुर्दैव असं की ती कसोटी पदार्पण करण्याआधीच ती दुखापतग्रस्त झाली. तिच्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचे कसोटी पदार्पण टळले. असे असले तरी त्यावर्षी तिने ऑस्ट्रेलियाकडून वनडे पदार्पण केले. पुढे तिला २००३ मध्ये इंग्लंड जेव्हा ऍशेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आले त्यावेळी कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तिने यावेळी सिडनी कसोटीत शतकही केले. मधल्या कालावधीत तिच्या आयुष्यात काही चढ-उतार आले. तिने या कालावधीत तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण २००२ मध्ये तिची आई कर्करोगशी लढाई देत असताना अनंतात विलीन झाली. याचा धक्का लिसाला जबरदस्त बसला. लिसा तिच्या आईच्या फार जवळ होती. पण या दु:खातून ती बाहेर आली.
पुढे २००५ मध्ये तर ती ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघातील महत्त्वाची सदस्य बनली. तिने त्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. पण अंतिम सामन्यात ती चांगलीच चमकली. अंतिम सामना होता तिचा जन्मदेश असलेल्या भारतीय संघाविरुद्ध. तिने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया ७१ धावांवर ३ बाद अशा अवस्थेत असताना केरन रोल्टनला भक्कम साथ दिली आणि १३९ धावांची भागीदारी रचली. तिने ५५ धावा केल्या. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना तिने अमिता शर्माची विकेट घेतली. तसेच जया शर्मा आणि हेमलाताला धावबाद करताना महत्त्वाची भूमीका बजावली. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. पुढे तिने २००६ ला भारताविरुद्ध झालेल्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. तिने ७२ धावा केल्या आणि ५ विकेट्सही घेतल्या. यात मिथाली राज आणि अंजूम चोप्राच्या विकेट्सचा समावेश होता. त्यानंतर तिने भारतात झालेल्या चौरंगी वनडे मालिकेतही सर्वांना प्रभावित केले. तिने त्या मालिकेत ९८.५० च्या सरासरीने ३९४ धावा केल्या. ती आता संघात मधल्या फळीत सातत्याने धावा करणारी आणि एक चांगली गोलंदाज म्हणून ओळखली जावू लागली होती. एवढेच नाही ती न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटही गाजवत होती. २००५-०६ पासून तिने न्यू साऊथ वेल्सला ५ वेळा सगल महिला नॅशनल चॅम्पियनशिप (WNCL) जिंकून दिले होते.
२००८ मध्ये जेव्हा आयसीसीने महिलांसाठी क्रमवारी सुरु केली तेव्हा तिने अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला होता. एवढेच नाही तर २००७ आणि २००८ ला तिला ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून पुरस्कारही मिळाला.
२००९ विश्वचषकापर्यंत ती ऑस्ट्रेलियन संघातील एक अनुभवी क्रिकेटपटू होती. तिने २००९ च्या विश्वचषकातही चांगली कामगिरी केली. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करता आली नसली तरी तिने गोलंदाजी करताना १५.६९ च्या सरासरीने आणि ३.४५ च्या इकोनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या. पुढे २००९ च्या पहिल्या महिला टी२० विश्वचषकातही तिने सर्वांना प्रभावित केले, परंतू त्या विश्वचषकात उपांत्यसामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडकडून पराभूत झाले. पण त्यापुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलिया संघ आणखी मजबूतीने २०१०चा टी२० महिला विश्वचषक खेळला आणि एवढेच नाही तर तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केला. या विजयात लिसाने बरी कामगिरी केली होती. पुढे लिसाने क्रिकेट प्रशासनातही पाऊल टाकले. ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनची पहिली महिला सदस्य बनली.
२०१३ हा भारतात झालेला महिला वनडे विश्वचषक तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक ठरला. ती तेव्हा एक दिग्गज म्हणून खेळत होती. तिच्या आयुष्यात भारताचे स्थान नेहमीच खास राहिले. अनेक महत्त्वाच्या टप्प्यावेळी तिच्या आयुष्यात भारत हा एक महत्त्वाचा भाग राहिला. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटही भारतात तोही मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विश्वविजेती म्हणून झाला. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्या विश्वचषकात लिसाने १२८ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – https://mahasports.in/lisa-sthalekar-is-an-indian-born-australian-cricketer/